महाराष्ट्रात भा.ज.पा. सरकारचे तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित एका कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते, ह्या प्रसंगी ते मित्रपक्ष शिवसेनेवर बरसले. आम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आक्षेप घेणे, विरोध करणे, टीका टिप्पणी करणे शिवसेनेच्या काही नेत्यांची सवयच झाली आहे. ज्यामुळे राज्याची जनता शिवसेनेवर नाराज होत आहे. प्रत्येक कामाला विरोध केल्यामुळे विकास कार्यांवर त्याच्या अयोग्य परिणाम होतो. ते म्हणाले कि मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे नेते सहमती दर्शवतात आणि बाहेर आल्यावर विरोधाचे सूर काढतात. ते म्हणाले कि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंशी माझा उत्तम संवाद आहे. त्यांच्याशी माझं नेहमीच बोलणे होत असते, परंतु त्यांचे मंत्री किंवा नेते माझ्याशी जे काही बोलतात ती प्रत्येक गोष्टीची चर्चा उद्धवजींशी करणे अयोग्य ठरते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews